दैनिक स्थैर्य । दि. 11 आक्टोंबर 2024 । फलटण । फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवार दि. 8 रोजी एकुण कांद्याची आवक 1370 क्विंटल झाली असून लाल कांदा रुपये 1500 ते 3000 तर गरवा कांदा रुपये 2000 ते 4000 प्रतिक्विंटलपर्यंत गेल्यामुळे कांद्याचे दर तेजीत असल्याची माहिती फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकर्यांनी कांदा आणताना तो प्लॅस्टिक पिशवीत न आणता नवीन सुतळी गोणीमध्ये आणावा नवीन सुतळी गोणीमध्ये आणल्यानंतर कांद्याला जादाचा दर देण्याचे आश्वासन बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली आहे.