
स्थैर्य, फलटण, दि. १ नोव्हेंबर : येथील मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील १९९२-९३ च्या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल ३२ वर्षांनी नुकताच उत्साहात साजरा झाला. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणे आणि गुरुजनांप्रती आदर व्यक्त करणे, हा या मेळाव्याचा उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी प्राचार्य तथा प्रशासनाधिकारी अरविंद निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिक्षक के.डी. पवार, अनंत डोईफोडे, कोळेकर, नाळे आणि पी.डी. काळे हेही उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अरविंद निकम यांनी तत्कालीन शैक्षणिक स्थिती आणि सध्याच्या बदलांचा आढावा घेत, सर्व क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव केला.
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ॲड. सुनील शिंदे, महेंद्र कांबळे, अमोल शिंदे, स्वाती कदम, पद्मा चौधरी, रेश्मा अहिरेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास किरण शेंडगे, सुनील शिंदे, सीमा तावरे, संभाजी भोसले, किरण वाघ, वैशाली एचकल, अशोक फरांदे, कुलदीप निवसे, नामदेव साळुंखे, अमोल शिंदे, मुनीर शेख, किरण अहिरेकर, संगीता गायकवाड, सारिका सावंत, ज्योती कुंभार, सुनील शिर्के, स्वाती गुंजवटे, पोपट धुमाळ, मीरा चौधरी, अंकुश धायगुडे, अंकुश ढवळे, आबासाहेब धायगुडे, आनंदा घनवट, अजित गौड, संजय चोरमले यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप निवसे यांनी केले. आभार सुनील शिंदे यांनी मानले. आगामी काळात पर्यटनाचा संकल्प करत स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
