
फलटण येथे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संयुक्त महायुती जाहीर मेळावा मंगळवार १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जाधववाडीतील साई मंगल कार्यालयात होणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १६ डिसेंबर : फलटण येथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संयुक्त महायुती जाहीर मेळावा मंगळवार १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जाधववाडी येथील सजाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे अध्यक्षपद माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भूषवणार असून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार चित्राताई वाघ उपस्थित राहणार आहेत.
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून संयुक्त जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून मतदारांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.
या मेळाव्यास आमदार सचिन पाटील, प्रल्हाद साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, अॅड. नरसिंह निकम यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
हा जाहीर मेळावा जाधववाडी येथील सजाई मंगल कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. भारतीय जनता पार्टी शाखा जाधववाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या जाहीर मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
