
दैनिक स्थैर्य । 22 एप्रिल 2025। फलटण । जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे हिंदूवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. निष्पाप नागरिकांवर हल्ला करणार्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फलटण येथील विविध वकिलांच्या माध्यमातून फलटण उपविभागीय अधिकार्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पहेलगाम याठिकाणी अतिरेक्यांनी पर्यटकांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 30 पर्यटक ठार झाले.
अतिरेक्यांनी धर्म विचारुन फक्त हिंदू पर्यटकांची निर्घृणपणे हत्या केली. याचा फलटण वकील संघाच्यावतीने तीव्र निषेध करत आहे.
या अतिरेक्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.