फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज; ८ वाजता मतमोजणी सुरू होणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ नोव्हेंबर २०२४ | फलटण | २५५ फलटण (अजा) विधान सभा मतदार संघ मतमोजणी उद्या शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ पासून शासकीय धान्य गोदाम, फलटण येथे सुरु होत असून त्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी दिली आहे.

या प्रक्रियेसाठी नियुक्त मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांना सकाळी ६ वाजता मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी यांना सकाळी ७ वाजलेपासून मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.

मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण २७ टेबल लावण्यात आले असून त्यापैकी १० टेबलवर टपाली आणि ३ टेबलवर सर्व्हिस व्होटर्स (सैन्य दलातील) मतमोजणी केली जाणार आहे. टपाली व सर्व्हिस व्होटर्स (सैन्य दलातील) ETPBS मतमोजणी १ फेरीमध्ये पूर्ण होणार आहे.

त्यानंतर EVM मतमोजणी प्रक्रिया सुरु  होणार असून त्यासाठी १४  टेबल लावण्यात आले आहेत. या मतमोजणीसाठी १४ टेबल वर २५ फेऱ्या आणि ५ टेबलवर २६ वी फेरी होईल.

प्रत्येक टेबल साठी १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ मतमोजणी सहाय्यक, १ मायक्रो ऑब्जरर्वर, १ तलाठी, १ शिपाई याप्रमाणे मतमोजणी व इतर तदनुषंगिक कामासाठी एकूण २०० मतमोजणी  अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

या मतदार संघात एकूण १ लाख ७२ हजार ९४० पुरुष व १ लाख ६६ हजार ७६८ स्त्री असे एकूण ३ लाख ३९ हजार ६६२ मतदार असून त्यापैकी १ लाख २६ हजार ३६४ पुरुष व १ लाख १५ हजार ४ अशा एकूण २ लाख ४१ हजार ३७६ म्हणजे ७१.०६ % मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतांची मोजणी २६ फेऱ्यांमध्ये केली जाणार आहे.

त्यापूर्वी होणाऱ्या टपाली व सर्व्हिस व्होटर्स बाबत मतदार संख्येचे आकडे उपलब्ध झाले नाहीत.


Back to top button
Don`t copy text!