फलटण रनर्स फाउंडेशनच्यावतीने 7 डिसेंबरला फलटण हेरिटेज मॅरेथॉन स्पर्धा


स्थैर्य, सातारा, दि. 26 नोव्हेंबर : फलटण रनर्स फाउंडेशनच्या वतीने सात डिसेंबरला फलटण हेरिटेज मॅरेथॉन 2025 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा प्रारंभ येथील सजाई गार्डन येथून होणार आहे. स्पर्धकांनी आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन फलटण रनर्स फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.या मॅरेथॉनमध्ये 21 किलोमीटर महिला व पुरुष विजेत्यास प्रथम बक्षीस दहा हजार व पदक, द्वितीय बक्षीस सात हजार व पदक, तृतीय बक्षीस पाच हजार व पदक देण्यात येणार आहे.
दहा किलोमीटर मॅरेथॉन टप्प्यांमध्ये प्रथम क्रमांक महिला, पुरुष दहा हजार व पदक, द्वितीय क्रमांक महिला, पुरुष सातहजार व पदक, तृतीय क्रमांक महिला, पुरुष पाच हजार व पदक बक्षीस ठेवण्यात आली आहे. याबरोबरच पाच किलोमीटर फन रन वय वर्षे 12 वरील सर्वांसाठी आहे. मॅरेथॉनसाठी वयोगट 18 वर्षे ते 35 वर्षे, 35 वर्षे ते 50 वर्षे आणि 50 वर्षांवरील प्रत्येक वयोगटातील विजेत्या महिला व पुरुषांना स्वतंत्र बक्षीस देण्यात येणार आहे. प्रवेश शुल्क पाच किलोमीटर 400 रुपये, दहा किलोमीटर 700 रुपये, 21 किलोमीटर 800 रुपये ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन फलटण रनर्स फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र बिचुकले, नानासाहेब काळुखे, चंद्रकांत जगदाळे, अनुजा त्रिपुटे, प्रवीण घोरपडे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!