
दैनिक स्थैर्य | दि. 23 एप्रिल 2025 | फलटण | फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका 2026 ते 2030 या काळात होणाऱ्या सर्व थेट सरपंच आरक्षणाबाबत निर्णायक पाऊल उचलले जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देशानुसार आणि दिनांक 5 मार्च 2025 रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने फलटण तालुका प्रशासनाने सजाई गार्डन, विमानतळाजवळील मंगल कार्यालय येथे गुरुवारी, 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता कार्यवाही आयोजित केली आहे, असे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या जाणाऱ्या या कार्यवाहीत स्थानिक प्रशासन, तालुका अधिकारी आणि संबंधित ग्रामपंचायत प्रतिनिधी सहभागी राहणार आहेत.
मतदार संघीय विभागांमध्ये आरक्षणांच्या अंमलबजावणीसाठी सजाई गार्डनमध्ये होणाऱ्या या बैठकीला स्थानिक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकही उत्सुकतेने उपस्थित राहणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुका येत्या काळात ठराविक आरक्षण नियमांनुसार पार पडण्यामुळे इच्छुक कार्यकर्ते कामाला लागले आहेत.