
स्थैर्य, फलटण, दि. 10 ऑक्टोबर : फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची जिल्हा अंतर्गत बदली झाली असून, त्यांच्या जागी अरविंद रंगनाथ काळे यांची प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याबाबतचे आदेश पारित केले आहेत.
या आदेशानुसार, हेमंतकुमार शहा यांची सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे, तर अरविंद काळे हे फलटण शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारतील.
फलटण नगरपालिका निवडणूक तोंडावर असताना झालेल्या या महत्त्वपूर्ण बदलीमुळे शहरातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.