
स्थैर्य, फलटण, दि. ३० सप्टेंबर : आसू (ता. फलटण) येथील उद्योजक रोहित शेडगे यांनी आज पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान, श्री. शेडगे यांनी फलटण तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
तालुक्यातील विविध विषयांवर या भेटीत संवाद साधण्यात आला.