महानुभावांची प्राचीन दक्षिण काशी श्री क्षेत्र फलटण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२२ । फलटण । महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र ,साधू संतांची जन्मभूमी तथा कर्मभूमी, थोर विचारवंतांची ओळख करून देणारा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी देणारा महाराष्ट्र

महानुभाव पंथाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या फलटण ला महत्व प्राप्त झाले असेल तर ते महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण
पैकी 3 रे कृष्ण म्हणून उल्लेख श्रीचक्रधर स्वामींनी केलेला आहे.पंथीय कल्पनेनुसार तिसरे पण ऐतिहासिक दृष्टिकोनातून कलियुगातील ते पहिले कृष्ण ठरतात कारण श्रीकृष्ण आणि श्रीदत्तात्रेय हे पौराणिक अवतार आहेत श्रीचक्रपाणि श्रीगोविंदप्रभु व श्रीचक्रधरप्रभू हे तिन्ही अवतार विद्यमान युगात जवळ जवळ समकालीन आहेत.

श्रीचक्रपाणि प्रभूंची चरित्ररेखा

साताऱ्या जिल्ह्यातील बाणगंगेच्या काठी असलेल्या फलटण या इतिहास प्रसिद्ध शहरात कऱ्हाडे ब्राह्मणाच्या घरी त्यांचा जन्म झाला. जनकनायक व जनकाईसा ही त्यांच्या मातापित्यांच्या नावे. श्रीचांगदेव आणि श्रीचक्रपाणि ह्या दोन्ही नावाने ते प्रसिध्द होते. पत्नीचे नाव कमलाईसा पित्याच्या वर्षश्रद्धा च्या दिवशीच पत्नी ने रतीभिक्षा मागितल्याने ते संसाराला विटले आणि माहूर ला निघालेल्या यात्रेकरू समवेत ते घराबाहेर पडले. माहूर येथे श्रीदत्तात्रेयांनी त्यांना व्याग्र रुपात त्यांना दर्शन दिले.माहूर ते पुराण प्रसिध्द क्षेत्रस्थान. माहूर येथे काही काळ व्यथित केल्यानंतर ते यांत्रिकांसमवेत द्वारकेला गेले आणी तेथील पाताळ गुंफेत राहू लागले.तेथील लीळा ही अलौकिकच. हाती खराटा घेऊन द्वारकेतील रस्ते झाडीत सुपामध्ये केराचे ढीग भरून ते गोमती नदी मध्ये नेऊन टाकीत असत.या त्यांच्या लोक विलक्षण लीळेच्या काळात कोणी भाग्यवान सापडला तर त्याला ते सुपाने व खरट्याने मारून कृपादान करीत असत.

श्री क्षेत्र फलटण येथील प्राचीनत्व
पौराणिक दृष्टीकोनातून एक आगळ वेगळ महत्व ह्या फलटण नगरीला लाभलेले आपल्याला पाहायला मिळते.
त्रेतायुगात फलस्थ ऋषी च्या वास्तव्याने पुनीत असलेल्या पावन भूमीत श्रीराजारामचंद्रजीना येथील श्रीकृष्ण मंदिरात श्रीदत्तात्रेय प्रभू नित्यदिनी कोल्हापूर येथे भिक्षेला जात असताना याच ठिकाणी दर्शन दिले असा उल्लेख या संप्रदायाचा ग्रंथात आढळतो.
तसेच श्रीकृष्ण भगवंताच्या चरण स्पर्शाने ही भूमी अति पवित्र झालेली आहे.याच ठिकाणी अभिमन्यू च्या विवाहाच्या प्रसंगी श्रीकृष्ण भगवंत वाई(विराटनगरी) देशी जात असताना एक रात्र मुक्काम याच ठिकाणी झालेला आहे ह्या पौराणिक लीळेचा संदर्भ ग्रंथ संपदेत आपल्याला पाहायला मिळतो. त्याच बरोबर या ठिकाणी श्रीचक्रपाणि प्रभूंचे सुमारे ३७ वर्षांचे वास्तव्य,तसेच अनेक जैन शैव वैष्णव वारकरी अशा अनेक संप्रदायाची संतांचा वारसा वसा या भूमीला लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो.

श्रीचक्रपाणि प्रभूंचे सोंदर्य..
श्रीचक्रपाणि प्रभूंचे वर्णन करीत असताना “गौरवर्ण सुंदर मूर्ती: बत्तीस लक्षांवित पुर्नलक्ष्मी असे देखोनि लोक कन्या द्यावया येति” असे श्रीचक्रपाणि प्रभूंचे वर्णन रवळोबासांनि सह्याद्री वर्णनामध्ये श्रीचक्रपाणि प्रभूंच्या संबंधी नमनाच्या ओघात केलेले मूर्तीवर्णन ही अलौकिक आहे.

जो नित्य तेज अधिष्ठाता : स्वयंप्रकाश आंनदसविता
तो उदैला चैतन्याचळ माथा : तया नमूं श्रीचक्रपाणि
असे वर्णन आपल्याला पाहायला मिळते.

श्रीचक्रपाणि प्रभूंचे स्वभाव विशेष.
श्रीचक्रपाणि प्रभू हे गर्भिचा अवतार फलटण येथे अवतार स्वीकारल्या वर पाचव्या वर्षी व्रतबंध विधी, सातव्या वर्षी मुंजीबंधन बाराव्या वर्षी ब्रह्मचर्य ,सन्यास स्वीकारल्याच्या उल्लेख ही मिळतो. इतकंच नाही तर परिपूर्ण अभ्यासपूर्णत्वामुळे क्षेपनिकाला स्वासामर्थ्याच्या जोरावर संवाद चातुर्याच्या आधारावर त्याचे मतखंडन करून निरुत्तर केले होते. श्रीचक्रपाणि प्रभू सामर्थ्य वंत अवतारी पुरुष होते. हे त्यांच्या चमत्कार पूर्ण प्रसंगातून प्रत्ययास येते.

श्रीचक्रपाणि प्रभूं स्वच्छ तेचे महामेरू
महाराष्ट्र मध्ये जर का कोणी प्रथम स्वच्छता अभियान सुरू केले असेल तर ते श्रीचक्रपाणि प्रभू द्वारकेला असतांना दररोज गल्ली,पेठ, रस्ते ,स्वतः उजव्या हाती खराटा आणि डाव्या हाती सूप घेऊन ते सर्व स्वछ करीत असत तो सर्व केर कचरा गोमती नदी मध्ये नेऊन टाकणे हे दररोज च सुरू असलेल कार्य ह्या कार्याची आठवण करीत आज आपल्या संपूर्ण भारत देशात स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले त्याच बरोबर फक्त प्राकृतिक स्वच्छताच नव्हे तर समाजाची आत्मिक स्वछता सुद्धा सातत्याने करीत राहिले.जनमानसांच्या मन बुद्धीतून विकल्प आणि दुरविचाराची स्वछता करून संकल्प आणि सद् विचारच बीजारोपण करून स्वछ आणि समृद्ध समाज घडवण्यात भारत वर्षाला फार मोठे योगदान दिले आहे.असे आपल्याला पाहायला मिळते.

श्रीचक्रपाणि प्रभूंचे ब्रह्मचर्य पालन
प्रभूंचे वास्तव्य द्वारकेला असताना अनेक लीळा अनेक चरित्र केले. श्रीचक्रपाणि प्रभूंची योग मार्गातील प्रसिद्धी ऐकून काउरळीची कामाख्या नावाची हटयोगिनी तिने तिच्या सामर्थ्याने अनेक सिद्ध साधक पुरुषांना तपसाधनेवरून ढाळले होते ती कामाख्या कामवासनेच्या लालसेने रती च्या अपेक्षेने त्यांच्याकडे गेली मात्र श्रीचक्रपाणि प्रभूंनी त्यावेळी ब्रह्मचर्य पालन केलेले होते.त्यावेळी प्रभूंनी तिला नकार दिला,परंतु ती हठयोगिनी असल्या कारणाने ती प्रभूंची आज्ञा ऐकेना ती बळजबरीने तिने पातळ गुंफेत येण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रभूंनी तिला श्रीदत्तप्रभूंची शपथ असे बोलून तिचा एक पाय उंबऱ्या च्या आत तर दुसरा पाय उंबऱ्याच्या बाहेर राहिला गेला अश्या स्तिथीत ती सात अहोरात्र उभी होती.तिचा तो आग्रह पाहून प्रभूंनी योग सामर्थ्याने आपल्या शरीराचा त्याग केला.व श्रीचक्रपाणि प्रभूंनी गुजरात येथिल भडोच नगरीतील मल्लदेव राजाचा प्रधान जो विशालदेव त्यांचा हरिपाल देव नामक पुत्राच्या मृत शरीरात प्रवेश केला त्यावेळी हरिपाल देव जिवंत झाले ते पाहून सर्वाना आश्चर्य झाले तेच हरिपाल देव पुढे श्रीचक्रधर प्रभू म्हणून प्रसिद्धीस आले आणि श्रीचक्रधर प्रभूंनी महानुभाव संप्रदायाची स्थापना केली.

श्रीचक्रपाणि चरित्रातील लोकजीवन
श्रीचक्रपाणि चरित्र हे अलौकिक अवताराचे पूरुषाचे असले तरी बाराव्या शतकातील सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब त्या मध्ये आढळून येते.
श्रीचक्रपाणि प्रभूंच्या जन्मापूर्वी त्यांच्या माता पित्यांनी पुत्रप्राप्तीसाठी ग्राम देवतेला केलेला नवस यावरून नवसजाप्याची प्रथा त्या काळी रूढ होती.चमत्कारांवर अति विश्वास गरीब श्रीमंत हे समाजातील भेदभाव,द्वैतअद्वैत मतप्रसार ,श्राद्धादिक कर्मे,व्रतवैकल्ये,सहस्र भोजन घालण्याची पद्धत संध्यास्नान ,यासारख्या गोष्टीत समाजाला त्या काळी फारसा रस होता. जेवणात मांडे,वडे,भात,यासारख्या पदार्थाची पाकनिष्पत्ती आढळते.

श्रीचक्रपाणि प्रभू तेच सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू
कामाख्याच्या हट्टापायी श्रीचक्रपाणिप्रभूंनी योगसामर्थ्याने शरीराचा त्याग करून हरिपाळ देवाच्या शरीरामध्ये परकाया प्रवेश करून पुढे तेच श्रीचक्रधर प्रभू म्हणून प्रसिद्धीला आले. तसे पाहता ह्या महानुभाव संप्रदायाचा पाया जर पाहायचं झालं तर ते उगमस्थान म्हणजेच श्री क्षेत्र फलटण.

श्रीचक्रधर प्रभूंनी सर्व समाजातील जातीतील लोकांना आपलेसे करून यथार्थ पने ज्ञान देऊन अनेक जीवांना नव्हे तर स्त्री ,पुरुषांला समान मोक्षाचा अधिकार आहे असे सांगितले.समता,साहिष्णुता,भेदाभेद न ठेवता सर्वाना ईश्वर भक्ती करण्याचा समान अधिकार आहे हे स्वामींनी सर्व तळागाळातील जनतेला सांगितले. महानुभाव संप्रदायाचा आद्यगद्य ग्रंथ श्रीलीळाचरित्र ग्रंथात अनेक भक्त परिवार व्यक्ती वैशिष्ट्य, लोकजीवन,समाजजीवन, चालीरीती,अशा अनेक प्रकारच्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात.संप्रदायाचा पुढे अनेक पोथ्यांचा माध्यमातून प्रचार प्रसार होत राहिला एक भक्तिमार्ग म्हणून ह्या संप्रदायाची ओळख महाराष्ट्र पुरती नव्हे तर संपूर्ण भारतभर व विदेशात ही या संप्रदायाचा भरपूर मोठ्या प्रमाणात अनुयायी भक्त परिवार पाहायला मिळतो.
श्री क्षेत्र फलटण नगरमध्ये अनेक भक्त परिवार मोठ्या संख्येने भाविक भक्त चैत्र पौर्णिमेला यात्रे करीता या ठिकाणी येत असतात.असे अलौकिक आगळ वेगळं महत्व सर्वांगीण दृष्टीने या पुण्य पावन नगरीला प्राप्त झालेले आपल्याला दिसते.

म.श्यामसुंदर जामोदेकर महानुभाव
श्रीपंचकृष्ण महानुभाव आश्रम
श्री क्षेत्र फलटण.


Back to top button
Don`t copy text!