वंजारी सेवा संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी फलटणचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांची निवड



स्थैर्य, फलटण : वंजारी सेवा संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी फलटण पंचायत समिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे. वंजारी सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी सातारा जिल्हा परिषद समाजकल्याण समिती माजी सभापती मानसिंगराव माळवे यांची,  उपाध्यक्षपदी  मायणी अर्बन बँक संचालक अँड. सुनील गंबरे व कार्याध्यक्षपदी गणपत खाडे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांना वंजारी सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रांत कार्यकरिणीवर नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्ती व निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या सर्वांच्या  जनसंपर्काचा आणि त्यांच्या समाजकार्यातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा वंजारी  समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व विविध समाजघटकांना मदतीसाठी होणार असल्याचे नमूद करीत या निवडीबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले आहे.

वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर, प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव गिते, महासचिव बाजी दराडे, कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, उपाध्यक्ष अमोल कुटे, युवा आघाडी राज्य प्रमुख प्रकाश आव्हाड, महिला आघाडी राज्य प्रमुख मंजुषा दराडे, प्रदेश उपाध्यक्ष  धनंजय मुंडे,  कोषाध्यक्ष अभिजित माळवे,  प्रदेश संघटक सुधाकर मुंडे  यांनी वरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सर्वानुमते केल्या असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!