फलटणला विकासाची बुलेट ट्रेन; अनेक विकासकामे मंजूर

माजी खासदार रणजितसिंह व आमदार सचिन पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 08 फेब्रुवारी 2025 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. या परिषदेत, फलटण येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होण्यासाठी शाशनाकडे प्रस्ताव दाखल केला असल्याची माहिती दिली, ज्यामुळे या फलटण शहरासह तालुक्यातील विकासाच्या अनेक योजना मार्गी लावल्या जाणार आहेत.

फलटण येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना अधिकारी पातळीवरच सेवा मिळेल. या कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासकीय कार्ये सुलभ होणार आहेत.

रेव्ह्यूने क्लबचे पुनर्निर्माण – फलटण येथील रेव्ह्यूने क्लबचे पुनर्निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी एका महिन्याच्या आत संपूर्ण पाडून नव्याने तयार करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी १० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.

सैन्य भरती भवन – उपळवे सावंतवाडी गावामध्ये सैन्य भरती भवन उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

अद्यावत क्रीडा संकुल – फलटण येथे क्रीडा संकुल उभारण्यासाठी सुमारे ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या संकुलात निष्णात कोच उपलब्ध करून दिले जाणार आहेत, ज्यामुळे युवकांना खेळाच्या क्षेत्रात प्रशिक्षण मिळेल.

फलटणच्या दाही दिशाला रस्त्याचे दमदार जाळे – फलटण – दहिवडी – मायणी रस्त्याचे टेंडर झाले आहेत. फलटण हे राष्ट्रीय महामार्गावरील सेंटर होणार आहे आणि चारही दिशेने जाणारे रस्ते अतिशय उच्च दर्जाचे आणि चौपदरी होणार आहेत. अल्प कालावधीत ही विकासकामे मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. पालखी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील अंतर्गत पालखी महामार्गाचे काम सुरू आहे आणि जवळपास ५० कोटी रुपयांचे विविध विकासकामे सुरू आहेत.

सांस्कृतिक भवन आणि बसस्थानक – फलटण शहरासाठी नवीन सांस्कृतिक भवन उभारण्याचे नियोजन आहे. बारामतीच्या धर्तीवर फलटण बसस्थानक तयार करण्यात येणार आहे.

ग्रामीण रुग्णालय आणि जलसंपदा कार्यालय – झिरपवाडी येथील ग्रामीण रुग्णालय सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सुरू करण्याचे काम सुरू आहे. कोळकी येथील जलसंपदा कार्यालय येथे सिंचन भवन उभारण्याचे नियोजन आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी सर्व विकासकामे मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष आभार मानले आहेत. हे विकासकामे फलटण आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशातील नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल आणणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!