दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२२ । फलटण । फलटण नगरपरिषदेची निवडणुक नुकतीच जाहीर झालेला आहे. सदर होणारी निवडणूक ही राष्ट्रीय काँग्रेस पक्ष समविचारी पपक्षांना सोबत घेवुन म्हणजेच शिवसेना व आझाद समाज पार्टीला बरोबर घेवुन आपण फलटण नगरपरिषदेची निवडणुक लढवणार असल्याची माहिती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी – बेडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
फलटण येथील हॉटेल आर्यमान येथे फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना व आझाद समाज पार्टीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी पालिका निवडणुक पुर्ण ताकदीने लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी फलटण नगरपालिका स्वबळावर व मित्र पक्षांच्या साथीने व ताकदीने लढवली जाईल, असे प्रतिपादन केले यावेळेस शिवसेनेचे विजय मायणे यांनी शिवसेना सुद्धा काँग्रेसबरोबर राहील अशी ग्वाही दिली.
आजाद समाज पार्टीचे सनी काकडे, मंगेश आवळे व महादेव गायकवाड यांनी ही काँग्रेसच्या साथीने निवडणूकीला सामोरे जाण्याची भुमिका घेतली. काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमीर शेख, शहर अध्यक्ष पंकज पवार, सिद्धार्थ देठणकर, उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे तसेच संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सदाशिव जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास काँग्रेस व मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी अजिंक्य कदम, प्रीतम जगदाळे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सुलेमान शेख, ओबीसी सेलचे दीपक शिंदे, अरुण खरात, भारत अहीवळे, तात्या गायकवाड, श्रेयश कदम, अमित फाळके, चैतन्य पवार, महामुनी, सुरज भुलाया, श्रीकांत पालकर, विक्रम निंबाळकर, एल.जी.बेंद्रे, राजू घनवट, अभिलाष शिंदे, सुनील निकोडे, मनोहर गायकवाड, नितीन जाधव, महेंद्र शिंदे, अजय इंगळे, प्रमोद चोरमले व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.