
दैनिक स्थैर्य । दि. ०९ एप्रिल २०२२ । फलटण । माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे सुप्रीमो खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील असलेल्या घरावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्त फलटण बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
याबाबत विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या “लक्ष्मी – विलास पॅलेस” या निवासस्थानी आयोजित बैठकीत फलटण बंदची हाक देण्यात आलेली आहे. त्यामध्ये फलटण पूर्णतः बंद करून अश्या प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुभाष शिंदे, आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. यावेळी विविध मान्यवर व राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.