दैनिक स्थैर्य | दि. १० सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण शहराला पाणीपुरवठा करणार्या सुधारित जलकेंद्र येथील ट्रान्स्फॉर्मर बसविणे व सेटलिंग टँकची स्वच्छता करण्याची असल्यामुळे फलटण शहराला मंगळवार, दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी होणारा पाणीपुरवठा होणार नाही. यास्तव शहरातील सर्व नागरिकांनी नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी केले आहे.