फलटण शहराची लोकसहभागातून स्वच्छता होणार; प्रशासक संजय गायकवाड यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । फलटण । सध्या पावसाळी दिवस सुरू असलेने साथरोगाच्या प्रार्दुभावावर प्रतिबंधात्मक उपाय योजना नगरपरिषदे मार्फत जून महीन्यापासून राबविणेत येत आहे. सदर प्रतिबंधात्मक उपाय योजना आणखी प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याने फलटण नगरपरिषद हददीमध्ये शुक्रवार दि. ०२ सप्टेंबर पासुन फलटण शहरामध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रसासक संजय गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

सदरच्या मोहिमे अंतर्गत शहरामधील सर्व नगरपरिषदेच्या खुल्या जागा तसेच खाजगी मालमत्ता धारक यांच्या खुल्या जागेमध्ये वाढलेली झाडे झुडपे काढून स्वच्छता करण्यात येणार आहे. नगर परिषदेने या माहीमे अंतर्गत सर्व प्रभागासाठी प्रभाग सचिव तसेच कर व आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यावर जाबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सर्व प्रभागासाठी लोकसहभागातून वेगळे जेसीबी उपलब्ध करणेत आलेले आहेत. सदरची स्वच्छता मोहिम ही सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राबविणेत येणार आहे. तसेच सदरची मोहीम आवश्यकते नुसार लोकसहभागातून राबविण्यात येणार आहे तरी खाजगी प्लॉट धारकांनी व नागरीकांनी या मोहीमेमध्ये सहभागी होवून स्वतःहून आपला सहभाग नोंदवावा व स्वच्छता करून घेण्यासाठी नगरपरिषदेस सहकार्य करावे, असेही प्रशासक गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!