बारामती पुलाजवळ अपघात: ट्रकचालक ठार, अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०३ फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बारामती चौकाच्या पुलाच्या जवळ काल दि. ०२ फेब्रुवारी रोजी दुपारी 2.45 वाजता एक गंभीर अपघात झाला, ज्यामध्ये 37 वर्षीय ट्रकचालक मुस्ताक जमाल खान याचा मृत्यू झाला.

मुस्ताक जमाल खान, राहणार फिरोजपुर तालुका मेवात हरियाणा, बारामतीकडून फलटणकडे येत असताना बारामती पुलाचे अली कडे कॅनॉल जवळ असलेल्या ठिकाणी हा अपघात झाला. तो लेलँड कंपनीचा ट्रक नं. NL.01 AH.7903 चालवत होता आणि वेस्पा कंपनीच्या मोटारसायकल भरून गोवा येथे निघाला होता.

अपघाताच्या वेळी मुस्ताक जमाल खान याने ट्रकच्या उजव्या साईटने बाहेर डोकावून पाहिले असताना, समोरून एका अज्ञात पिकअप सारख्या दिसणाऱ्या वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचे तोंडाला, डोक्याला जोराची धडक दिल्याने त्यास गंभीर जखमी करून मरणास कारणीभुत झाले. अज्ञात पिकअप चालकाने अपघाताची खबर न देता जखमीस औषधोपचारास न घेता पळुन गेला.

या घटनेबाबत खलील इसाक खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 45/2025 भा.न्या.सं कलम 106(1), 281, 125(a), 125(b), मो.वा.का. कलम 134(a),134(b),184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे यांनी तपास सुरू केला आहे आणि संशयित वाहनाचा शोध घेण्यासाठी आजूबाजूचे साक्षीदार यांच्याकडे विचारपूस व सीसीटीव्ही तपासणी केली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!