दैनिक स्थैर्य | दि. 08 फेब्रुवारी 2025 | फलटण | फलटण शहरात दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 13:00 वाजताचे सुमारास एक गंभीर घटना घडली. हाँटेल बिस्मील्ला, कुरेशीनगर, आखरीरस्ता, फलटण येथे बिलाल रफिक कुरेशी नावाच्या व्यक्तीने हद्दपार आदेशाचा भंग केल्याचे समोर आले आहे.
सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांनी बिलाल रफिक कुरेशी यांना सातारा, पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर व सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुका या हद्दीतुन पुढील दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. हद्दपार आदेश क्रमांक स्था.गु.शा. 11/2024 म.पो.का.क55/2992/2024 सातारा दि.27/11/2024 अन्वये हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, बिलाल रफिक कुरेशीने कोणाचीही परवानगी न घेता हद्दपार क्षेत्रात परतल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणात फिर्यादी अनिल एकनाथ देशमुख, वय 35 वर्षे, फलटण शहर पोलीस ठाणे यांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बिलाल रफिक कुरेशी, वय 39 वर्षे, रा. कुरेशीनगर, मंगळवारपेठ, फलटण, ता. फलटण यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.