फलटण शहर व तालुका भाजपचे म. फुले यांना विनम्र अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि.१२ एप्रिल २०२२ । फलटण । म. ज्योतीबा फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने शहरातील म. फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, फलटण तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, अध्यात्मिक विकास आघाडीचे अशोकराव जाधव, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पिंटू नाना इवरे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, अल्पसंख्यांक सेलचे रियाजभाई इनामदार, तालुका उपाध्यक्ष संतोष सावंत, किरण राऊत, संदीप नेवसे, एम. के. भुजबळ, विक्रम शिंदे, गोविंद भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते बंडू अहिवळे व इतर भाजपा कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्वच भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मनोगताद्वारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याचा गौरव केला व विनम्र अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!