वाहनाच्या वादातून फलटणमधील नागरिकाचा कुटुंबीयांसह आत्मदहनाचा इशारा


स्थैर्य, फलटण, दि. १३ ऑगस्ट : एका फायनान्स कंपनीसोबत सुरू असलेल्या वाहनाच्या वादात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत, तालुक्यातील घुळदेव येथील एका नागरिकाने आपल्या संपूर्ण कुटुंबासह दि. १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी फलटणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित फायनान्स कंपनीकडून गाडी परत मिळावी, यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत मोठी दिरंगाई होत असून, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. गाडी हेच उपजीविकेचे साधन होते, तेच नसल्याने आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे, असे किसन चंद्रकांत नरुटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणात प्रशासनाने लक्ष घालून तातडीने न्याय मिळवून द्यावा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आपण कुटुंबीयांसह आत्मदहन करू, असा इशारा किसन नरुटे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!