
स्थैर्य, फलटण, दि. ०३ : फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांची पुणे महानगरपालिकेत उपायुक्त पदी बदली झालेली आहे. तर फलटणच्या मुख्याधिकारी पदी मुरगुड जि. कोल्हापुर येथील मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या बाबत नगरविकास विभागाचे आदेश पारित झालेले असल्याची माहिती समोर येत आहे.