उपळवे येथील स्वराज कारखान्यातील चोरी प्रकरणाचा फलटण ग्रामीण पोलिसांकडून ४८ तासांत छडा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १२ : स्वराज इंडिया ऍग्रो साखर कारखाना उपळवे, ता. फलटण येथील चोरी प्रकरणाचा फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने छडा लावून या चोरीच्या घटनेतील चोरीला गेलेला तीन लाख चौदा हजार सातशे बाव्वान रुपये किमतीचा मुद्देमाल केवळ ४८ तासांमध्ये हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. या घटनेतील सर्व चारही आरोपीना ग्रामीण पोलिसांनी या पूर्वीच अटक केलेली आहे.

सोमवार दि. ८ मार्च रोजी उपळवे, ता. फलटण येथील स्वराज इंडिया ऍग्रो साखर कारखाना येथील स्टोअर रूम मधून एक लाख ७३ हजार ५२० रुपये किमतीचे गन मेटल बुश, एक लाख ४१ हजार २३२ रुपये किमतीचे ब्रास लायनर असा एकूण तीन लाख १४ हजार ७५२ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्यात आलेला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी विक्रम गणेश जगदाळे, रा. सावंतवाडी, ता. फलटण, शशिकांत विष्णू कदम – रा. दर्याचीवाडी, ता. फलटण, अक्षय रामचंद्र जाधव, रा. श्रीरामनगर (उपळवे) ता. फलटण, अमोल अरविंद शिंदे, रा. शिंदेवाडी, ता. फलटण यांना ग्रामीण पोलिसांनी या पूर्वीच संशयावरून अटक केलेली होती. या घटनेतील आरोपींकडून कसोशीने चौकशी केली असता त्यांनी या गुन्हयाची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला एकूण तीन लाख १४ हजार ७५२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संजय बोंबले, पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख, पोलिस हवालदार डांगे, पोलीस नाईक तुपे, देवकर, काशीद, पोलीस कॉन्स्टेबल जगदाळे, अवघडे, कुंभार, पाटोळे, गायकवाड यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!