वृद्ध महिलेला तातडीची मदत: अनुप शहा व फिरोज आतार यांचे सामाजिक योगदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २८ डिसेंबर २०२४ | फलटण | फलटण शहरातील नाना पाटील चौक येथे सुमारे 80 ते 85 वयाची एक वृद्ध महिला चक्कर येऊन पडली होती. त्यावेळी तेथील स्थानिक नागरिकांनी तिला उचलून आणून देण्याचा प्रयत्न चालू होता. याच वेळी अनुप शहा व फिरोज आतार हे आपले मित्र तानाजी कदम व सचिन नाईक यांच्या समवेत तेथून जात होते. त्यांना ही घटना दिसल्यावर, अनुप शहा यांनी तातडीने नगरपालिकेच्या ॲम्बुलन्सला बोलवून घेतले.

ॲम्बुलन्सची व्यवस्था करून, अनुप शहा, फिरोज आतार, तानाजी कदम, सचिन नाईक, संतोष भोजने आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वृद्ध महिलेला जिल्हा उप रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थिती गंभीर असल्याने स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, पुढील उपचारासाठी तिला बारामती येथील मेडिकल हॉस्पिटलच्या दवाखान्यांमध्ये पाठवून दिले गेले.

माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून, अनुप शहा हे फलटण मध्ये विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात.

अनुप शहा व फिरोज आतार यांनी केलेल्या या कामाबद्दल अनेकांकडून अभिनंदन होत आहे. ही घटना सामाजिक उत्तरदायित्वाच्या दृष्टिकोनातून प्रशंसनीय आहे आणि समाजातील इतर नेत्यांना देखील या दिशेने पावले उचलण्यास प्रेरणा देणारी आहे.


Back to top button
Don`t copy text!