फलटणचे साहित्यिक सुरेश शिंदे यांच्या ‘सत्याचा आसूड’ कादंबरीला नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार


स्थैर्य, फलटण, दि. १० ऑक्टोबर : फलटण तालुक्यातील आसू येथील ग्रामीण वास्तववादी साहित्यिक ‘सर्ज्या’कार सुरेश शिंदे यांच्या ‘सत्याचा आसूड’ या कादंबरीला प्रतिष्ठेचा ‘कवी नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे फलटणच्या साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक येथे आयोजित साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होईल. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे करणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप १०,००० रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे.

‘सत्याचा आसूड’ या कादंबरीला ज्येष्ठ समीक्षक प्रा. रणधीर शिंदे यांची विवेचक प्रस्तावना लाभली आहे.


Back to top button
Don`t copy text!