दैनिक स्थैर्य | दि. ०५ जानेवारी २०२५ | फलटण | बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटर व फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त वतीने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत फलटण तालुक्यातील पाहिली ते दहावी पर्यंतच्या गटातील १५,००० विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ काल महाराजा मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या चित्रकला स्पर्धेमध्ये फलटण शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक क्षमतेचा प्रत्यय दिला. स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची प्रदर्शनी देखील आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या रचनात्मकतेचा प्रत्यय दिसून आला.
बक्षीस वितरण समारंभात फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम, फलटण पंचायत समितीच्या तज्ज्ञ समव्यवचक सौं. दमयंती कुंभार, फलटण बिल्डर्स असोसिएशनचे चेअरमन किरण दंडिले आणि मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य सुधीर अहिवळे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रशस्ती पत्र वितरित करण्यात आली. यावेळी रणधीर भोईटे, राजीव नाईक निंबाळकर, प्रमोद निंबाळकर, दिलीप शिंदे, महेंद्र जाधव, सचिन निंबाळकर, स्वीकार मेहता, नंदकुमार काळुखे, जाविद तांबोळी, संजय डोईफोडे, सुनील सस्ते, नितीन बोबडे, निखिल सोडमिसे व स्वप्नील सोडमिसे यांसारखे अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.
फलटण शहर व तालुक्यातील सर्व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेने विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक क्षमता विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटर व फलटण एज्युकेशन सोसायटी यांनी असे सांगितले की भविष्यात देखील अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.