
स्थैर्य, फलटण, दि. २८ सप्टेंबर : फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या, सोमवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता समितीच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर असणार आहेत.
या सभेत प्रामुख्याने २०२४-२५ सालच्या वार्षिक अहवाल व ताळेबंदावर चर्चा करून त्यास मंजुरी देणे, २०२३-२४ सालच्या शासकीय लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे आणि २०२५-२६ च्या अंदाजपत्रकावर चर्चा करणे यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
तरी या सभेला तालुक्यातील सर्व शेतकरी, ग्रामपंचायत सरपंच, विकास सोसायट्यांचे चेअरमन, भुसार, कांदा, फळे-भाजीपाला आडते असोसिएशन, कामगार युनियन, खरेदीदार, हमाल व मापाडी प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे.

