फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १४०० रुपयांचा कमाल भाव; २७६३ पिशव्यांची आवक


फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात कांद्याला कमाल १४०० रुपये तर सरासरी ९०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. बाजारात एकूण १३८२ क्विंटल म्हणजेच २७६३ पिशव्यांची आवक झाली असून शेतकरी वर्गाचे लक्ष बाजारभावाकडे लागले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 11 मार्च : कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण येथील मुख्य बाजार आवारात मंगळवारी कांद्याला कमाल १४०० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे. बाजारात कांद्याची एकूण १३८२ क्विंटल म्हणजेच २७६३ पिशव्यांची आवक झाली असल्याची नोंद बाजार समितीच्या दप्तरी झाली आहे.

बाजार समितीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मुख्य बाजारात कांद्याची आवक सध्या सुरू असून बाजारभावात चढउतार पाहायला मिळत आहेत. मंगळवारी झालेल्या लिलावात कांद्याला किमान ३५० रुपये, कमाल १४०० रुपये आणि सरासरी ९०० रुपये प्रतिक्विंटल इतका बाजारभाव मिळाला आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणताना तो चांगल्या प्रतीचा आणि प्रतवारी केलेला असावा याची काळजी घ्यावी, जेणेकरून शेतमालास योग्य आणि चांगला बाजारभाव मिळू शकेल. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला जास्तीत जास्त शेतमाल फलटण बाजार समितीतच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!