
स्थैर्य, फलटण, दि. १ नोव्हेंबर : राज्यात २०२४-२५ च्या हंगामासाठी हमीभावाने सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदी करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याअंतर्गत कोल्हापूर विभागात एकमेव शासकीय खरेदी केंद्र म्हणून फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड करण्यात आली आहे.
केंद्र शासनाने २८ ऑक्टोबर रोजी हमीभाव खरेदी प्रक्रियेस मंजुरी दिली होती. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने ८३ पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची यादी सादर केली. राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने (दि. ३० ऑक्टोबर) रोजी या ८३ केंद्रांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला.
केंद्र शासनाने या हंगामासाठी सोयाबीन (१,५०,००० मे.टन), मूग (३३,००० मे.टन) आणि उडीद (३,२५,६०० मे.टन) खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार, नाफेड, एनसीसीएफ आणि नेएमएल या संस्थांना फलटणसह राज्यातील ८३ बाजार समित्यांमध्ये तात्काळ खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

