फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : छाननीमध्ये १०९ अर्ज पात्र तर १२ अर्ज ठरले अपात्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०५ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. दि. ३ रोजी नामनिर्देशित पत्र म्हणजेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिवस होता. त्या दिवशी १८ जागांसाठी १२१ अर्ज दाखल झालेले होते. या अर्जांची छाननी आज झाली. या छाननीमध्ये एकूण १२१ अर्जांपैकी १०९ अर्ज वैध ठरले, तर १२ अर्ज अवैध ठरले आहेत.

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध मतदारसंघातून प्रवर्गनिहाय प्राप्त अर्जांची संख्या व त्यातील पात्र व अपात्र अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे –

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी पत व बहूद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून एकूण ८१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी आज झालेल्या छाननीमध्ये ७३ अर्ज पात्र ठरले, तर ८ अर्ज अपात्र ठरले आहेत.

या मतदारसंघात सर्वसाधारण प्रवर्गातून ५२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४७ अर्ज पात्र ठरले तर ५ अर्ज अपात्र ठरले आहेत.

महिला प्रतिनिधी वर्गातून ९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८ अर्ज पात्र ठरले तर १ अर्ज अपात्र ठरला.

इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधीमधून ६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी आज छाननीमध्ये सर्वच्या सर्व अर्ज पात्र ठरले.
वि.जा.भ.ज. प्रतिनिधी प्रवर्गातून एकूण १४ अर्ज प्राप्त झाले होते, तर त्यापैकी छाननीमध्ये १२ अर्ज पात्र ठरले तर २ अर्ज अपात्र ठरले आहेत.

ग्रामपंचायत मतदारसंघातून एकूण ३५ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी आज झालेल्या छाननीमध्ये ३१ अर्ज पात्र ठरले तर ४ अर्ज अपात्र ठरले आहेत.

या मतदारसंघातून सर्वसाधारण प्रवर्गातून एकूण २६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २५ अर्ज वैध ठरले तर १ अर्ज बाद ठरला.

याच मतदारसंघाच्या अनु. जाती-जमाती प्रतिनिधी वर्गातून २ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ अर्ज पात्र तर १ अर्ज अपात्र ठरला.

आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटक प्रतिनिधी प्रवर्गातून एकूण ७ अर्ज प्राप्त झाले होते, तर त्यापैकी छाननीमध्ये ५ अर्ज वैध ठरले तर २ अर्ज अवैध ठरले आहेत.

अनुज्ञप्तीधारक व्यापारी आडते मतदारसंघातून एकूण ४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व ४ अर्ज पात्र ठरले आहेत.

हमाल, मापाडी मतदारसंघातून एकच अर्ज प्राप्त झाला होता. तो अर्ज छाननीमध्ये पात्र ठरला आहे.

अशाप्रकारे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज झालेल्या छाननीमध्ये १०९ अर्ज पात्र ठरले आहेत, तर १२ अर्ज अपात्र ठरले आहेत. पैकी हमाल, मापाडी मतदारसंघातून एकच अर्ज प्राप्त झाला होता. तो अर्ज निलेश सुरेश कापसे यांचा असून ते या मतदारसंघातून बिनविरोध निवडून येणार आहेत. त्यामुळे १०९ पात्र अर्जांपैकी १०८ उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहे.


Back to top button
Don`t copy text!