
दैनिक स्थैर्य | दि. 08 एप्रिल 2025 | फलटण | मुंगी घाटाने शेवट चढणारी सासवड येथील प्रथम मानाची कावड तेल्या भुताची कावड यांचे फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी फलटण प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, महसूल नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, मंडलाधिकारी शीलवंत चव्हाण, तलाठी सोमनाथ पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाचे हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.