लोकसभा निवडणुकीसाठी फलटण प्रशासन सज्ज : प्रांताधिकारी सचिन ढोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 17 मार्च 2024 | फलटण | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काल पासून लागू झाली आहे. माढा लोकसभा मतदासंघांपैकी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी फलटण तालुका प्रशासन सज्ज झाली असून त्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा कार्यान्वित झाली आहे; अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी तथा 43 माढा लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

फलटण येथे 43 माढा लोकसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती नियंत्रण कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी ढोले बोलत होते. यावेळी फलटणचे तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी ढोले म्हणाले की; माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये तिसरा टप्प्यात म्हणजेच 7 मे रोजी मतदान आहे तर मतमोजणी ही 4 जुन रोजी संपन्न होणार आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी 5 फिरती पथके तैनाद करण्यात आली आहे.

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 4,67,051 लोकसंख्या आहे. तर 3,34,855 एवढे मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष 1,71,454, महिला मतदार ह्या 1,63,387 तर तृतीयपंथी मतदार 14 आहेत; असेही प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!