
दैनिक स्थैर्य । दि. 26 मे 2025 । फलटण । फलटण तालुक्यामध्ये जी सध्या पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे फलटणमध्ये येणार्या व फलटणमधुन जाणारी बस ही जावली येथे अडकुन पडली तर दुसरी बस ही दुधेबावी येथे अडकली होती. यामधुन प्रवास करणार्या सर्व प्रवाशांची जेवणाची व राहण्याची सोय ही फलटण प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे.
यामध्ये फलटणवरुन शिंगणापुर येथे जाणारी बस ही जावली येथे अडकल्याने यामध्ये असणारे तब्बल 46 प्रवासी अडकले होते. त्यांची जेवणाची व राहण्याची सोय ही करण्यात आली होती.
यासोबतच फलटणवरुन दहीवडीकडे जात असलेल्या बसमध्ये 25 प्रवासी अडकले होते. त्याची राहण्याची व जेवणाची सोय ही दुधेबावी व भाडळीमध्ये करण्यात आली होती.