५३ वे विज्ञान प्रदर्शन: “जगाची वाटचाल तंत्रज्ञानाच्या दिशेने”; कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांचे प्रतिपादन, पाहा विजेत्यांची यादी


फलटणमध्ये ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी १९० शाळांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. वाचा सविस्तर निकाल.

स्थैर्य, फलटण, दि. ०९ डिसेंबर : “मानवाचा प्रवास हा अज्ञानाकडून ज्ञानाकडे, ज्ञानाकडून विज्ञानाकडे आणि विज्ञानाकडून आता तंत्रज्ञानाकडे झाला आहे. आजचे जग हे संपूर्णपणे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दिशेने वेगाने धावत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विज्ञानातील प्रयोगशीलता, संशोधन वृत्ती आणि कौशल्याधारित शिक्षण आत्मसात करणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ (सातारा) चे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले.

फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि कोळकी येथील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

परिसंवादातून उलगडले विज्ञान

समारोपापूर्वी आयोजित परिसंवादात माजी प्राचार्य रविंद्र येवले, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के आणि गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे दिली. या मुक्त संवादाचा लाभ उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतला. प्रदर्शनात तालुक्यातील १९० शाळांनी सहभाग नोंदवला होता.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी निवृत्त प्राचार्य रविंद्र येवले, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, कथाकथनकार प्रा. रविंद्र कोकरे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे रणजित निंबाळकर, बाजार समितीचे संचालक मोहनराव डांगे, उपसरपंच अशोक नाळे, मनोज पवार, गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती, समन्वयिका दमयंती कुंभार आदी उपस्थित होते. संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका संध्या गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर प्राचार्या सुजाता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ज्योत्स्ना पवार व शीतल पवार यांनी केले.

५३ व्या विज्ञान प्रदर्शनाचा निकाल (विजेते)

विज्ञान प्रतिकृती (Models) – माध्यमिक गट:

  • प्रथम: सर्वेश शिंदे (मालोजीराजे शेती महाविद्यालय, फलटण)

  • द्वितीय: ऋतुगंधा रणवरे (खुटे हायस्कूल, खुटे)

  • तृतीय: विनायक खोमणे (पाचपांडव आश्रम शाळा, अलगुडेवाडी)

  • उत्तेजनार्थ: कृणाल जाधव (मुधोजी हायस्कूल, फलटण)

विज्ञान प्रतिकृती (Models) – प्राथमिक गट:

  • प्रथम: सोहम भोईटे, ओम धुमाळ (न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, आदर्की बुद्रुक)

  • द्वितीय: चैतन्य गुंजवटे, अधिराज वांभुरे, सार्थक सोनवलकर, सोहम नेवसे (प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, कोळकी)

  • तृ‍तीय: आयुष जाधव, वरुण चव्हाण, प्रणव खराडे (प्राथमिक शाळा, काळज)

  • उत्तेजनार्थ: सई गायकवाड, ईश्वरी कंक (जिल्हा परिषद शाळा, तरडगाव)

शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक गट:

  • माध्यमिक शिक्षक (प्रथम): धनंजय दिनकर सस्ते (यशवंतराव चव्हाण हायस्कूल, फलटण)

  • प्राथमिक शिक्षक (प्रथम): आशा यादव (साखरवाडी विद्यालय)

  • उत्तेजनार्थ: शैला पिसाळ (विनर्स गुरुकुल, नाईकबोमवाडी)

  • प्रयोगशाळा सहाय्यक (प्रथम): जयंत हनुमंत काळुखे (साखरवाडी विद्यालय)

दिव्यांग विद्यार्थी गट:

  • प्रेम पवार, अनिकेत बापूराव, चैतन्य पवार (मूकबधीर विद्यालय, ठाकूरकी)

वक्तृत्व स्पर्धा:

  • माध्यमिक (प्रथम): दैवत मारकड (न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, सुरवडी)

  • प्राथमिक (प्रथम): श्रीनी तंगारे (यशवंतराव चव्हाण विद्यालय, फलटण)

प्रश्नमंजूषा स्पर्धा:

  • माध्यमिक (प्रथम): वैष्णवी तावरे, श्रेया यादव, खुषी दोशी (कमला निमकर बालभवन)

  • प्राथमिक (प्रथम): आदिती पन्हाळे, वैभवी घोरपडे, निग्राह कच्छी (बीजे इंग्लिश मीडियम स्कूल, साखरवाडी)


Back to top button
Don`t copy text!