आज दिगंबर आगवणे यांचा वाढदिवस, दरवर्षी दिगंबर आगवणे यांचा वाढदिवस त्यांचे कार्यकर्ते धुमधडाक्यात साजरा करणार यात कसलिही शंका नाही. सध्या करोनामुळे संपुर्ण जगात थैमान घातले असल्याने ह्या वर्षी दिगंबर आगवणे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा होणार नाही. तरीही आगवणे यांचे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देणारच यात कसलिही शंका नाही. फलटण तालुक्यातील एकमेव नेता असा असेल की त्याच्या कडे तालुक्याची सत्ता कधीही नाही किंवा नव्हती परंतु फलटण तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांचे कार्यकर्ते हे आहेतच. कार्यकत्यांबरोबर त्यांना मानणार वर्ग ही फलटण तालुक्यात खुप मोठा आहे. फलटण तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये फक्त आगवणे यांचीच सत्ता आहे. तिथले कार्यकर्ते स्पष्ट सांगतात की आमचे नेते हे दिगंबर आगवणेच आहेत. बाकी कुणीही काहीही सांगु दिंगबर आगवणे जो आदेश देतील तोच आम्हाला मान्य असेल. अश्या ह्या नेत्याचा आज वाढदिवस त्यानिमित्त ……
आता काही महिन्यांपुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीपुर्वी दिंगबर आगवणे यांनी काही निर्णय योग्य वेळी घेतले असते तर दिंगबर आगवणे हे आज फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातुन ते विधानसभेवर निवडुन गेले असते. परंतु काही निर्णय घेण्यास त्यांना वेळ लागला तर काही निर्णय त्यांना नियतीवर सोडुन द्यावे लागले होते. एका सर्वसामान्य कुटुंबातुन येवुन तालुक्यासह जिल्ह्यात आपले वेगळे नाव करण्यात दिगंबर आगवणे यांनी नक्कीच यश मिळवले आहे. आता नुकत्याच काही महिन्यापुर्वी झालेल्या निवडणुकित दिंगबर आगवणे यांना पराभव स्विकारावा लागला होता. परंतु हारणे किंवा जिंकण्याचा विचार आगवणे हे फक्त निवडणुकीपुरताच करतात. दिंगबर आगवणे हे लवकरच फलटण तालुक्याच्या विकासासाठी समाजकारणात सक्रिय दिसतील, अशी आशा सध्या फलटण तालुक्यातील जनतेला आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल 60 हजार मतदान घेताना विरोधकांना घाम फोडण्यात दिगंबर आगवणे यांनी यश मिळविले होते. माजी खासदार हिंदुराव निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण कोरेगाव मतदार संघामध्ये दिगंबर आगवणे यांनी चांगलाच झंझावात निर्माण केलेला आहे. फलटण तालुक्यात जनसंपर्क राखण्यात आगवणे यांनी यश मिळविले आहे. विधानसभा निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता त्यांनी पुन्हा नव्या जोमाने आपल्या कार्यास सुरुवात केली असुन आगामी काळात आगवणे हे पुर्ण ताकदिने तालुक्याच्या विकासासाठी झटतील यात कसलीही शंका नाही.
फलटण तालुक्यात गिरवी हे दुष्काळी गाव. या गावात परंपरेनुसार पिठाच्या गिरणीचा व्यवसाय करणार्या रोहिदास आगवणे व प्रभावती आगवणे यांचा मुलगा दिगंबर आगवणे यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच काही तरी चांगले करुन दाखविण्याची उर्मी होती. मात्र, सदान्कदा असलेले दारिद्रय, मान – अपमान या गोष्टींमुळे काही वेळा त्यांना नैराश्येने घेरलेले असायचे. वडिलांनी पिठाची गिरणी सुरु केल्यानंतर त्यांच्याबरोबरच गिरणीत दिगंबर काम करु लागले. गिरणीत दळण दळता – दळता मनातही एक एक विचार रुजत होते. त्यासाठी नशिबाची साथ व संधी येण्याची ते वाट पाहत होते. ही संधी शिक्षण मिळविल्याशिवाय येणार नाही, याची जाणीवही होती. घरातले कोण फारसे शिकले नसतानाही शिक्षणाच्या आशेने मिळेल ते काम करीत चांगले शिक्षण घेतले. चांगले शिक्षण घेतल्यामुळे चांगले संस्कार, चांगले विचार, आचार मनात रुजून चांगले काही तरी करण्याची उर्मी मनात होती. लहान – मोठी कामे व छोटे छोटे व्यवसाय करीत शेती घेतली. यातून चांगले उत्पन्न वाढविण्याबरोबरच लाकडाचा व्यापारही सुरु केला. याच काळात अत्यंत चांगला धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण व समाजकारण करण्याचा. रणजितसिंह यांच्या साथीमुळे समाजकारण करण्याचा दिगंबर आगवणे यांचा आत्मविश्वास उंचावला गेला. अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. रणजितसिंह यांना गुरु मानून राजकारण व समाजकारणात उडी मारली. गत दोन वर्षापूर्वी दुष्काळाचे प्रचंड सावट तालुक्यावर होते. शासकीय यंत्रणा दुष्काळ निवारणात कमी पडत होती. अशा परिस्थितीत दिगंबर आगवणे यांनी स्वखर्चाने दुष्काळ पडलेल्या गावात पाण्याचे टँकर सुरु केले. त्यांना कितीही पाणी द्या असे आदेश त्यांनी टँकर चालकांना दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. एवढ़यावरच न थांबता त्यांनी दुष्काळी गावात पाणी साठविण्यासाठी सिंटेक्स टाक्यांचे वाटप केले. जशी माणसांना पाणीटंचाई भासत होती, तशी जनावरांनाही भासत होती. जनावरांच्या चारा – पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. अनेकजण कवडीमोल किमतीत जनावरे विकत होते. अशा परिस्थितीत जनावरे जगविण्यासाठी त्यांनी गिरवी येथे जनावरांची छावणी सुरु केली.
सध्या वैद्यकीय क्षेत्र खूप महागडे झाले आहे. गोरगरीबांना महागडी वैद्यकीय सेवा परवडत नाही. त्यामुळे पैशाअभावी अनेक रुग्णांची हेळसांड होते. अशा परिस्थितीत उपचारही होत नसल्याची माहिती समजताच तडक दवाखान्यात जाऊन त्यांनी आर्थिक मदत केली आहे. अनेक गोरगरीब रुग्णांचा लाखो रुपयांचा वैद्यकीय खर्च केला आहे. वेळोवेळी आरोग्य शिबिर घेणे, नेत्रतपासणी व मोफत चष्मेवाटप करणे आदी उपक्रम त्यांचे सातत्याने सुरुच असतात.
अडचणीत असणार्यांना वाट्टेल ती मदत करीत असतात. त्यांच्या दारात मदतीच्या अपेक्षेने गेलेल्या कोणासही ते रिकामे हाताने परत पाठवित नाहीत. तालुकास्तरावर विविध स्पर्धांना त्यांचे पाठबळ असते. तालुक्यातून चांगले खेळाडू तयार व्हावेत, यासाठी ते प्रयत्नशील असतात. विविध व्यायाम व तालीम मंडळांनाही त्यांनी भरीव मदत केली अहे. वेळ मिळेल तसे ते शेतीत रमत असतात. शेतीमध्ये विविध प्रयोग करुन एकरी उत्पन्न कसे वाढेल, याबद्दल ते प्रयत्नशील असतात. फळबागांची पिके घेण्याकडे त्यांचा प्राधान्याने कल असतो. आजही फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दिगंबरशेठ आगवणे गावोगावी पोहचून विविध कार्यक्रम, वाढदिवस तसेच दुष्काळी परिस्थिती पाहून लोकांना आधार देण्याचे काम करत आहेत. आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याला दीर्घायुरारोग्य लाभो. हीच सदिच्छा.