पेट्रोल – डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट लोकांवर ओढवले; फलटण मध्ये काँग्रेसचे आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : जग सध्या कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे. या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. उद्योग धंदे अजूनही पूर्वपदावर आलेले नाहीत. बहुसंख्या जनता जगण्यासाठी धडपड करत आहे. अशा कठीण प्रसंगी पेट्रोल – डिझेलच्या महागाईन आणखी एक संकट लोकांवर ओढवले आहे. या दुहेरी संकटाचा सामना करताना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे. ०७ जुन २०२० पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ केली जात असून शनिवार पर्यंतची ही दरवाढ पाहता पेटोल मध्ये प्रति लिटर ९ .१२ रुपय तर डिझेलमध्ये ११.०२ रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. देशभरात पेट्रोलच्या किंमती प्रति लिटर ८७-८८ रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. तर दिल्ली मध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त महाग आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्या तेलाचे दर निच्चांकी पातळीवर असताना त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा विचार करुन देशांतर्गत इंधनाचे दर ठरविले जात असताना सध्या ती पारदर्शकता राहिलेली नाही. २०१४ मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क हे ९ .४० रुपये तर डिझेल ३.५६ रुपये होते. सध्या हेच शुल्क पेट्रोल ३२.९ ८ रुपये तर डिझेल ३१.८३ रुपये असे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करुन सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य आहे. सर्वसामान्य जनता दुहेरी संकटात असताना आपण या प्रश्नी जातीने लक्ष घालून दिलासा दयावा अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने थेट भारताच्या राष्ट्रपतींना केलेली आहे. या बाबतचे सविस्तर निवेदन फलटणचे नायब तहसीलदार ठोंबरे यांच्याकडे सादर केलेले आहे.

या वेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, नगरसेवक सचिन बेडके, आमिरभाई शेख, शिवाजीराव फडतरे, महेंद्र बेडके, पंकज पवार, किसनराव भोसले, सोपानराव जाधव, आमिरखान मेटकरी, सिद्धार्थ दैठणकर, दीपक शिंदे, प्रीतम जगदाळे, रोहन कांबळे, अशोक भोसले, बाळासाहेब मेटकरी, शरद सोनवणे यांची उपस्थिती होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!