स्थैर्य, सोलापूर, दि. 22 : जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडून जिल्ह्यातील 875 औद्योगिक प्रकल्प सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
औद्योगिक आस्थापनांनी लॉकडाउन कालावधीत औद्योगिक घटक सुरू करण्याकरिता शासनाच्या permission.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करावा. त्यानुसार चौकशी करून प्रकल्प सुरू करण्याची परवानगी औद्योगिक प्रकल्पांना दिली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 353 औद्योगिक प्रकल्प सुरू झाले आहेत. या प्रकल्पात 7391 कामगार काम करत आहेत. औद्योगिक प्रकल्पांच्या पाच वाहनांना येण्या-जाण्यासाठी पासेस देण्यात आलेले आहेत.
सुरू झालेल्या या औद्योगिक प्रकल्पांमध्ये जीवनावश्यक वस्तू , सॅनिटायझर, मास्क निर्मिती, रासायनिक खते, बी बियाणे उत्पादन, औषधी निर्मिती व इंजिनिअरिंग वस्तू आदी उत्पादनांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.