स्थैर्य, कराड, दि. 20 : कुंभार समाजाचे अर्थकारण अवलंबून असते ते म्हणजे गणेशोत्सवावर गणेशोत्सव जवळ आला की लगबग असते ती मूर्ती बनविण्याची. परंतु यंदा कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे मूर्ती व्यावसायिकांवर मोठे संकट असताना कराड व उंब्रज येथील गणपती मूर्तिकार व्यावसायिक श्रीकांत कुंभार, प्रमोद कुंभार, मनोज कुंभार, सुरेश कुंभार, विकास कुंभार, हेमंत कुंभार, अमोल कुंभार यांनी मूर्ती बनविण्यासाठी आवश्यक असणार्या कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी ना. बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले व पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. या चर्चेनंतर कच्चा माल वाहतूक करणार्या वाहनांना पास उपलब्ध झाले असून कच्च्या मालाची वाहतुकीसाठी परवानगी मिळाली आहे. यामुळे या व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच त्यांनी ना. बाळासाहेब पाटील यांना धन्यवाद दिले.