दैनिक स्थैर्य | दि. 07 ऑगस्ट 2024 | फलटण | राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना फलटण शहरातील तळागाळातील नागरिकांना पोहचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व माऊली फौंडेशन यांचे कामकाज कौतुकास्पद असून त्यांना संपूर्ण सहकार्य लाभणार आहे. लोकसभा निवडणुकीत फलटण तालुका हा माजी खासदार रणजितसिंह यांच्या सोबत राहिला असल्याने आगामी निवडणुकीत सुद्धा जनता नक्कीच याची दखल घेणार असल्याचे मत जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण येथे बांधकाम कामगार साहित्य वितरणाच्या कार्यक्रमात जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचे आजी, माजी पदाधिकारी व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे सर्वसामान्य नागरिकांसाठी कामकाज करीत आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना ह्या सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देण्यात माजी खासदार रणजितसिंह यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे विशेष मेहनत घेत आहेत. फलटण शहरासह तालुक्यातील जनता ही सुज्ञ झाली आहे. हे आता खासदारकीच्या निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आहे; असे मत यावेळी ॲड. सौ. जिजामाला यांनी व्यक्त केले.
अनुप शहा यांचे कार्य कौतुकास्पद
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अनुप शहा हे राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी धडपडत आहेत. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत सुद्धा यावेळी ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)