दैनिक स्थैर्य । दि. १३ मे २०२३ । मुंबई । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक विधानसभेच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या विजयाने आनंदित झालेल्या ठाकरे गटाच्या, राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोले लगावले आहेत. या निकालाचा महाराष्ट्र आणि देशाच्या निकालावर काही परिणाम होणार नाही. मुंगेरी लाल के हसीन सपने कधी पूर्ण होणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.
काही लोकांना देश जिंकला असे वाटत आहे. त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघावेत. कर्नाटकात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. 1985 पासून कुठलेच सरकार रिपीट होऊ शकले नाही. यावेळी तो ट्रेंड तोडू शकलो नाही. २०१८ मध्ये आम्हाला जितकी मते मिळाली, त्यात अर्धा टक्का मते कमी झालीत. पण जागा मोठ्या संख्येने कमी झाल्या. जेडीएसची पाच टक्के मते कमी झाली, ती काँग्रेसला मिळाल्याचे विश्लेषण फडणवीस यांनी मांडले.
काही लोकांना तर देश जिंकला असे वाटत आहे. त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजेत. वार्डाच्या निवडणुकीत आम्ही हरलो , तरी त्यांना शहा मोदींचा पराभव दिसतो. राहुल गांधी पप्पू आहे हे त्यांनी मान्य केले आहे. शरद पवारांना कर्नाटक मध्ये शून्य टक्केही जागा नाही. मतदारांनी ऐकले आणि राष्ट्रवादीचे पार्सल वापस पाठविले, अशी टीका फडणवीसांनी केली.
उत्तर प्रदेशमधल्या स्थानिक निवडणुकांचे निकाल एका बाजुने लागलेत. जो उत्तर प्रदेश जिंकतो तो देश जिंकतो असे म्हणतात. ‘बेगाणे की शादी में अब्दुल दिवाणा’ अशी काही लोकांची स्थिती आहे. या लोकांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या घरी मुल जन्माला आले की आनंद साजरा केला आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.