रणजितदादांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास! प्रभाग ११ मध्ये संदीप चोरमलेंच्या प्रचारात सकारात्मक वातावरण


स्थैर्य, फलटण, दि. २६ नोव्हेंबर : फलटण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधील भाजप उमेदवार संदीप चोरमले यांनी आपला प्रचार ‘हाऊस टू हाऊस’ (घरोघरी) सुरू ठेवला आहे. प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांना मतदारांमध्ये मोठा उत्साह आणि भाजप-राष्ट्रवादीच्या उमेदवारांविषयी सकारात्मक वातावरण दिसून येत आहे, अशी माहिती संदीप चोरमले यांनी ‘स्थैर्य’शी बोलताना दिली आहे.

ते म्हणाले, प्रभागातील नागरिक आता विकासाला महत्त्व देत आहेत. महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी लोकांमध्ये आपुलकी आणि एक सकारात्मकता दिसत आहे. हा प्रतिसाद पाहता आम्ही निवडणुक जिंकणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संदीप चोरमले मतदारांना त्यांनी सांगितलेल्या विकासाच्या वचनांवर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचे आवाहन करत आहेत. रणजितदादांच्या नेतृत्वावर नागरिक आपली मोहोर उमटवतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकंदरीत, प्रभाग ११ मध्ये संदीप चोरमले यांचा प्रचार सकारात्मक आणि उत्साहाच्या वातावरणात सुरू आहे. विकासाचे आश्वासन आणि रणजितदादांचे पाठबळ या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर भर देत त्यांनी विजयाची खात्री व्यक्त केली आहे.

 


Back to top button
Don`t copy text!