जुन्या छत्र्या दुरुस्त करण्यासाठी लोकांची लगबग सुरू


स्थैर्य, सातारा, दि. 18 : मोसमी पावसाला सुरुवात झाल्याने जुन्या छत्र्या दुरुस्त करण्यासाठी लोकांची लगबग सुरू झाली आहे.

करोनाच्या प्रादुर्भावाने उन्हाळा कसा गेला ते कळलेच नाही. यंदा  मोसमीपूर्व पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र हिरवळ आहे. साधारणत: जूनच्या दुसर्‍या आठवड्यात मोसमी पावसाचे आगमन होत असते. मोसमी पावसाच्या आगमनापूर्वी रेनकोट, छत्री, चप्पल खरेदी तयारी केली जातेे. यंदा मात्र ऑनलाइन शाळा असल्याने पुस्तकांची दुकाने, रेनकोट, छत्रीच्या दुकानातही खरेदीसाठी गर्दी दिसत नाही.

ज्या जुन्या छत्र्या आहेत त्याच दुरुस्त करण्याकडे लोकांचा कल आहे. कोरोनाच्या भीतीने अधिकतर लोक बाहेर पडत नाहीत. गेल्या अडीच महिन्यात लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यामध्ये चप्पल, छत्री दुरुस्तीवाल्यांचे तर प्रचंड हाल झाले आहेत. राजवाडा परिसरात चप्पल व छत्री दुरुस्त करणारे बसलेले असतात. शाळा व महाविद्यालये बंदचा फटका यांनाही बसला आहे. नोकरदार वर्ग सोडला तर जास्त लोक बाहेर पडत नसल्याने हा व्यवसाय मात्र आर्थिक अडचणीत आला आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!