
स्थैर्य, वडले, दि. १९ ऑगस्ट : वडले (ता. फलटण) येथील युवा नेतृत्व पै. काकासाहेब सोनवलकर यांची नवी मुंबई-कळंबोली येथील राजे मल्हारराव होळकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल नवी मुंबई, कळंबोली येथील नागरिक तसेच वडले ग्रामस्थ आणि मित्रपरिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
राजे मल्हारराव होळकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी नुकतीच संचालक मंडळाची निवडणूक पार पडली होती. यामध्ये पै. काकासाहेब सोनवलकर यांची संचालक म्हणून निवड झाली होती. त्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांची उपाध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.