
स्थैर्य, फलटण, दि. 29 : साखरवाडी-जिंती रस्त्यावर भरधाव वेगातील पीकअप जीपने पादचार्यास धडक दिल्याने पोटात व डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. राहुल उर्फ आप्पा ठोंबरे (वय 28, रा. तांबेवस्ती, पिंपळवाडी (साखरवाडी)), असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघाताची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयताचा भाऊ लालासाहेब बापू ठोंबरे यांनी दिलेल्या खबरीनुसार (एम. एच. 16 एवाय 5987) या पीकअप वरील चालक निलेश विश्वास नरुटे, साखरवाडी हा सदर वाहन जिंती-साखरवाडी मार्गे साखरवाडीकडे जात असताना रुपनवर वस्तीजवळ हा अपघात घडला.