
दैनिक स्थैर्य | दि. १८ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
फलटण येथील सांगली ते अहमदनगर रस्त्यावर सोमवार पेठ, ता. फलटणच्या हद्दीत कदम पेट्रोलपंपासमोर मालट्रकने (क्र. एमएच २० एटी १३९९) दिलेल्या धडकेत पादचारी कल्याणी विनायक माने (वय ३३ वर्षे, रा. सोमवार पेठ, फलटण) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघाताची फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
या अपघातप्रकरणी ट्रकचालक विकास पोपट वेदपाठक, रा. हंगा, ता. पारनेर, जि. अहमदनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोफौ वसंत कदम करत आहेत.