दैनिक स्थैर्य | दि. २० सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण शहरातील सर्व शांतता कमिटी सदस्यांची उद्या, दि. २१ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता दरबार हॉल, तहसील कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, उपविभागिय पोलिस अधिकारी श्री. राहुल धस उपस्थित राहणार आहेत.
या सर्व सदस्यांनी वेळेत दरबार हॉल, तहसील कार्यालय, फलटण येथे उपस्थित राहावे, असे फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.