दैनिक स्थैर्य । दि. १३ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । पेटीएम या भारतातील अग्रगण्य पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि मोबाइल व क्यूआर पेमेंट्सच्या अग्रणी कंपनीने जानेवारी २०२३ साठी त्यांच्या व्यावसायिक कार्यसंचालन कामगिरीची घोषणा केली आहे. कंपनीने ऑफलाइन पेमेंट्ससंदर्भात बाजारपेठेतील आपले अग्रस्थान कायम राखले आहे, जेथे ६.१ दशलक्ष व्यापारी आता पेमेंट डिवाईसेससाठी सबस्क्रिप्शन्स भरत आहेत. एमटीयू ८९ दशलक्ष राहिला, ज्यामध्ये वार्षिक २९ टक्क्यांची प्रबळ वाढ झाली. पेटीएमने एकूण व्यापारी पेमेंट्स मूल्यामध्ये सतत वाढीची नोंद केली. जानेवारीमध्ये व्यासपीठाच्या माध्यमातून प्रक्रिया करण्यात आलेले एकूण व्यापारी जीएमव्ही १.२ लाख कोटी रूपये (१५ बिलियन डॉलर्स) राहिले, ज्यामध्ये वार्षिक ४४ टक्क्यांची वाढ झाली.
कंपनीच्या कर्ज वितरण व्यवसायाने अव्वल कर्जदात्यांसोबत सहयोगाने अधिक वाढ पाहणे सुरूचे ठेवले आहे, जेथे वितरणांमध्ये वार्षिक ३२७ टक्क्यांची वाढ झाली. जानेवारी महिन्यामध्ये ३,९२८ कोटी रूपयांच्या कर्जांचे वितरण करण्यात आले. जानेवारी महिन्यासाठी कर्जांची आकडेवारी वार्षिक १०३ टक्क्यांच्या वाढीसह ३.९ दशलक्षांपर्यंत वाढली.