दैनिक स्थैर्य । दि. २२ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । ब्रॅण्ड पेटीएमची मालक असलेली कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल)ने देशातील ९ ज्योतिर्लिंग आणि आसपासच्या मंदिर भागांमध्ये विशेष क्यूआर कोड्स लावत भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण सण महाशिवरात्री साजरा केला. भारतातील क्यूआर व मोबाइल पेमेंट्सच्या अग्रणी कंपनीने भगवान शिवचा फोटो असलेला महाशिवरात्री विशेष क्यूआर कोड डिझाइन केला.
देशात १२ ज्योतिर्लिंग आहेत, जेथे पेटीएमने गुजरातमधील सोमनाथ, मध्य प्रदेशमधील महाकालेश्वर व ओंकारेश्वर, झारखंडमधील बैद्यनाथ, महाराष्ट्रातील भीमाशंकर, तामिळनाडूमधील रामेश्वरम, गुजरातमधील नागेश्वर, वाराणसीमधील काशी विश्वनाथ आणि औरंगाबादमधील घृष्णेश्वर येथे विशेष क्यूआर कोड्स लावले.
कंपनीने उत्तराखंडमधील हरिद्वार व ऋषिकेश आणि कोईम्बतूरमधील ईशा फाऊंडेशनमध्ये देखील महाशिवरात्री स्पेशल क्यूआर कोड लावला होता. यासह, पवित्र स्थळांना भेट देणारे भाविक आसपासच्या दुकानांमध्ये व भोजनालयांमध्ये पेटीएम क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकले.
पेटीएम क्यूआर कोड लहान व मध्यम दुकानदारांना शून्य अपफ्रण्ट खर्चामध्ये आणि झीरो एमडीआरमध्ये डिजिटल पेमेंट्स स्वीकारण्यास सक्षम करतो. कंपनी ऑफलाइन पेमेंट्समध्ये अग्रणी आहे, जेथे ३१ दशलक्षांहून अधिक मर्चंट सहयोगी पेटीएमच्या माध्यमातून पेमेंट्स स्वीकारतात. तसेच पेटीएम ग्राहकांना पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय लाइट, पेटीएम यूपीआय, पेटीएम पोस्टपेड, डेबिट व क्रेडिट कार्ड्स आणि नेटबँकिंगच्या माध्यमातून पेमेंट्स करण्याची देखील सुविधा देते.