पेटीएमची के. वाय. सी. करून देतो म्हणून सुमारे चौदा लाखाला गंडा; फलटण मध्ये गुन्हा नोंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. 03 : दिनांक 28/6/2020 सकाळी 10.00 वाजले पासून ते दिनांक 01/07/2020 रोजी दुपारी 4.00 वाजन्याच्या दरम्यान  फिर्यादी यांच्या कोळकी येथील स्वप्नपूर्ती अपारमेन्ट मध्ये राहते घरी असताना मोबाइल वापरणारे अभिषेक शर्मा, केपी सिन्हा,  राविकुमार अशी नावे धारण केलेल्या अज्ञात इसमांनी मला वेळोवेळी फोन करून माझा विश्वास संपादन करून पे. टी. एम. अँपची केवायसी  व्हेरिफिकेशन करून देतो, असे म्हणून माझ्या मोबाईलचा क्विक सपोर्ट ॲप द्वारे एक्सेस मिळवून माझ्या क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डच्या या माहितीचा वापर करून माझ्या LIC, HDFC, ICICI बँकेच्या  क्रेडिट कार्ड मधून व ICICI बँकेच्या खात्यामधून विविध 38 ट्रांजेक्शन  द्वारे एकूण 13,98,271 रुपये माझ्या संमतीविना काढून घेऊन माझी  फसवणूक केली आहे म्हणूनची तक्रार दत्तात्रय दिनकर दडस यांनी फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेली आहे. सदरचा गुन्हा फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर नंबर व कलम 225/2020 भा. द. वी. 420,34 व IT act 66(c)(d) नुसार नोंद झाला असल्याची माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली. या बाबतचा अधिक तपास फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण करीत आहेत.

सदर फिर्यादी हे मुंबई मधील पवई येथे एका कंपनीत इंजीनियर म्हणून काम करित आहेत. लाॅकडाउन कालावधीमध्ये ते कोळकी येथे आले होते. त्यांची मुले नवी मुंबई येथे शाळेमध्ये शिकत आहेत व त्यांना शाळेमध्ये PAYTM द्वारे पैसे भरण्यासाठी शाळेने लिंक पाठवली असता त्यामधून लिंक ओपन झाल्यानंतर  PAYTM डाउनलोड करण्यास सांगितले पेटीएमद्वारे एक मेसेज आला व त्यामध्ये मोबाईल नंबर होता. त्यानंबरवर फोन केल्यानंतर त्याने 1 रुपयाचे व्यवहार करण्यास सांगितले. ज्या ईसमाने फोन घेतला त्याने क्विक सपोर्ट हे ऍप डाउनलोड करण्यास सांगितले व त्याद्वारे फिर्यादीच्या मोबाईलचा ऍक्सेस घेतला. वैयक्तीक माहिती मोबाइल मधून घेवून बॅक अकाउंट व क्रेडीट कार्डमधील एकूण १३ लाख ९८ हजार रुपये काढून घेतले.

गेल्या काही महिन्यांपासून फलटण शहरासह फलटण तालुक्यामध्ये सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले असून काहीजण आपल्या व्यवसायाच्या भीतीपोटी गुन्हा दाखल करण्यासाठी भीत आहेत. तर काहीजणांच्या खात्यातून हजार ते पंधरा हजार रुपये पर्यंत ही रक्कम लंपास करत असून जे नागरिक नेट बँकिंग अथवा यूपीआय वापर करतात, त्यांनी यापुढे जपून व्यवहार करणे अत्यंत गरजेचे आहे. आगामी काळामध्ये सायबर हल्ले वाढण्याची शक्यता ही वर्तवली जात असून त्याचा फटका फलटण तालुक्यातील छोट्या माणसांना व लघु उद्योजकांना बसत आहे. तरी व्यवसायिकांनी व नागरिकांनी आपण सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शक तत्त्वे यांचा पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!