दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । मुंबई मेट्रो वनचे एक लाखांहून अधिक प्रवासी पेटीएम अॅप वापरून नियमितपणे ई-तिकिट्स विकत घेत असून यामुळे डिजिटल तिकिटिंगमध्ये एका नवा मैलाचा टप्पा गाठला गेल्याची घोषणा भारताची सर्वात मोठी डिजिटल पेमेंट्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी असलेल्या आणि क्यूआर व मोबाइल पेमेंट्स सुविधांच्या क्षेत्रात पायाभूत काम करणाऱ्या पेटीएमची मालक कंपनी वन९७ कम्युनिकेशन लिमिटेडने आज केली.
पेटीएम अॅपवरून यूजर्सना मुंबई मेट्रो वनसाठीचे आगळेवेगळे क्यूआर-आधारित तिकिट काढता येते, जे स्थानकांच्या एन्ट्री आणि एक्झिट गेट्सवर स्कॅन करता येते. मुंबई मेट्रो वनचे प्रवासी मेट्रो स्टेशनवर लावले गेलेल्या पेटीएम क्यूआर फलकावरील कोडचे स्कॅनिंग करूनही डिजिटल तिकिट खरेदी करू शकतात. यामुळे दररोज मेट्रोने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची सोय होत असून त्यांचा प्रवासाचा वेळ वाचत आहे. यूजर्सना पेटीएम अॅपवरून आपले मेट्रो स्मार्टकार्ड रिचार्ज करता येतो आणि स्टोअर व्हॅल्यू पास नावाचे डिजिटल मेट्रो कार्ड तसेच ट्रिप पास नावाचा सवलतीच्या दरात मिळणारा पासही खरेदी करता येतो.
पेटीएम हे मेट्रो तिकिट बुकिंग आणि मेट्रो स्मार्टकार्ड रिचार्जच्या क्षेत्रात आघाडीवर असून कंपनीची सेवा दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबईमध्ये उपलब्ध आहे. आपल्या ग्राहकांसाठी वापराच्या दृष्टीने मोलाच्या सेवा निर्माण करण्यासाठी आणि डिजिटल जगात सुलभतेने मार्ग काढण्यास त्यांची मदत करण्यासाठी फिनटेक क्षेत्रातील एक नवसंकल्पना राबविणारी कंपनी या नात्याने पेटीएम सतत नवे बदल आणणाऱ्या तंत्रज्ञानाची निर्मिती करत असते.
मुंबई मेट्रो वनसाठी ई-तिकिट्स कशी खरेदी करावीत:
१. पेटीएम अॅपच्या होम स्क्रीनवर तिकिट बुकिंग भागातील ‘मुंबई मेट्रो वन’ आयकॉनवर क्लिक करा
२. ‘फ्रॉम’ आणि ‘टू’ अर्थात प्रवास सुरू करण्याचे आणि गंतव्यस्थान असलेले मेट्रो स्टेशन निवडा म्हणजे तुमचे युनिक क्यूआर आधारित मेट्रो तिकिट तयार होईल.
३. हा युनिक क्यूआर कोड मेट्रो स्टेशनच्या एन्ट्री आणि एक्झिट गेटपाशी सहज स्कॅन करता येईल.