दैनिक स्थैर्य । दि. ०६ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । पेटीएम या भारतातील आघाडीच्या पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर व मोबाइल पेमेंट्सच्या अग्रणी कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांची घोषणा केली आहे. कंपनीने ईएसओपी खर्चापूर्वी ईबीआयटीडीए ३१ कोटी रूपयांसह त्यांचा ऑपरेटिंग नफा टप्पा गाठला आहे, जे सप्टेंबर २०२३ च्या निर्धारित टाइमलाइनपूर्वीच लक्षणीयरित्या संपादित केला. ईएसओपी मार्जिनपूर्वी ईबीआयटीडीए एक वर्षापूर्वीच्या २७ टक्क्यांच्या तुलनेत महसूलाच्या २ टक्के राहिला.
पेटीएमने आपल्या व्यवसायांमध्ये प्रबळ महसूल गती कायम राखली. कंपनीचा कार्यसंचालनामधून महसूल २,०६२ कोटी रूपयांपर्यंत वाढला (या तिमाहीमध्ये कोणत्याही यूपीआय इन्सेंटिव्हची नोंद नाही), ज्यामध्ये वार्षिक ४२ टक्क्यांची आणि तिमाही-ते- तिमाही ८ टक्क्यांची वाढ झाली. तिमाहीमध्ये योगदान नफा १,०४८ कोटी रूपये होता, मार्जिन्स सतत डिसेंबर २०२१ मधील ३१ टक्क्यांवरून डिसेंबर २०२२ मध्ये ५१ टक्क्यांपर्यत वाढले, तर पेमेंट व्यवसायामधील सुधारित नफ्यामुळे निव्वळ पेमेंट मार्जिन ४५९ कोटी रूपयांपर्यंत (वार्षिक १२० टक्क्यांची वाढ) वाढले.
मुख्यत्वे कर्ज वितरण असलेल्या आर्थिक सेवांमधील महसूल आता एकूण महसूलांच्या २२ टक्के आहे, जे आर्थिक वर्ष २०२२च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये ९ टक्के होते. कंपनीच्या कर्ज वितरण व्यवसायाने तिमाहीमधील वितरित करण्यात आलेल्या ९,९५८ कोटी रूपयांच्या १०.५ दशलक्ष कर्जांसह अधिक वाढ केली (त्यांच्या कर्जदाता भागीदारांसोबत सहयोगाने). पेटीएमचा ऑपरेटिंग नफा अप्रत्यक्ष खर्चांमधील कपातीमधून (महसूलाच्या टक्के) दिसून आला आहे, जो डिसेंबर २०२१ मधील ५८ टक्क्यांवरून डिसेंबर २०२२ मध्ये ४९ टक्क्यांपर्यंत कमी झाला.